
मराठी ब्लॉगवर लिहायच म्हणजे सुरूवात कोणापासून करावी हा प्रश्न पडला. खूप खूप विचार केल्यावर एक नाव डोक्यात आलं ते म्हणजे... letusbhankas.... महाराष्ट्रातल्या तमाम मराठी पत्रकार बांधवांचा आवडता ब्लॉग. म्हणून त्या संगणक पत्त्यावर गेलो तर तिथे दिसलं भलतच. अशोक सुरवसे नामक कोणा पत्रकाराने म्हणे तो ब्लॉग हॅक केलाय. त्यामुळे मूळ प्रश्न तसाच. लिहायच कशावर? शेवटी मदतिला आला एक पत्रकार मित्रच. त्यानं सांगितलं की या भंकसचाच एक सख्खा भाऊ आलाय आता, त्याचं नाव म्हणे बातमीदार. यावर म्हणे पत्रकारांच्याच फिरक्या घेतल्या जातात. मग म्हंटलं जाऊन बघू आणि काय सांगू महाराजा? मजा आली. मग निश्चय पक्का.. दे ध्क्का असं म्हणत ठरवलं की हेच आपलं पहिलं टार्गेट. मग उद्यापासून वाचा, मराठी ब्लॉगचा ब्लॉग. तळटीप : हा ब्लॉग सगळ्याच ब्लॉगची छेड काढेल.हं! वाईट वाटून ना।ही घ्यायचं. म्हणजे मराठीत... नो हार्ड फिलिंग्ज हं!
1 टिप्पणी:
http://policenama.blogspot.com
टिप्पणी पोस्ट करा